व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

Updated: Sep 12, 2015, 04:47 PM IST
व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण! title=

मक्का : सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

या दुर्घटनेत जवळपास २३० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १५ भारतीयांचा समावेश आहे.

या महिन्याच्या अखेरीस हज यात्रा सुरू होत आहे. त्याआधी मुख्य मशिदीच्या परिसरात क्रेन पडून हा अपघात झाला. 

परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची ही क्रेन कोसळून त्याखाली १०७ जणांनी आपले प्राण गमावलेत. 

व्हिडिओ पाहा:

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.