VIDEO : अवकाश यानात गोरिलानं केला अंतराळवीराचा पाठलाग

अंतराळात मानव पोहचला असला तरी गोरिला पोहचणं कसं शक्य आहे? हे होऊ शकतं का?

Updated: Mar 2, 2016, 12:26 PM IST
VIDEO : अवकाश यानात गोरिलानं केला अंतराळवीराचा पाठलाग  title=

नवी दिल्ली : अंतराळात मानव पोहचला असला तरी गोरिला पोहचणं कसं शक्य आहे? हे होऊ शकतं का?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये एक गोरिला एका ब्रिटिश अंतराळवीराचा पाठलाग करताना व्हिडिओमध्ये कैद झालाय. अंतराळ यात्री टीम पिक याचा गोरिलानं केलेला पाठलाग या व्हिडिओमध्ये कैद झालाय. 

त्याचं झालं असं.... की अंतराळ स्पेस स्टेशनमध्ये गोरिला नाही तर आणखीन एक अंतराळ यात्री स्कॉट केली आणि टिम पिकमध्ये सुरू असलेली ही मस्ती आहे. गोरिलाचा सूट घालून स्कॉटनं आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ही मजा मस्ती सुरू होती.

गोरिलाचा हा सूट स्कॉटला त्याचा भाऊ मार्कनं त्याला गिफ्ट केला होता. मार्क स्वत:ही अंतराळ यात्री होता. स्कॉटनं स्पेस स्टेशनमधूनच हा मजेशीर व्हिडिओ पोस्ट केलाय.