नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवरबाहेरही निदर्शने झाली. 

PTI | Updated: Nov 10, 2016, 07:16 PM IST
नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत निदर्शने title=

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं सुरू झाली आहेत. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये ट्रम्प यांचं निवासस्थान असलेल्या ट्रम्प टॉवरबाहेरही निदर्शने झाली. 

ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान स्थलांतरित, मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याक गटांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करण्यात आला. हे आमचे अध्यक्ष नाहीत, ट्रम्प परत जा, अशा प्रकारच्या घोषणा निदर्शक देत होते. 

तर सिएटलमध्ये झालेल्या निदर्शनांदरम्यान गोळीबाराची घटना घडली. यामध्ये पाच जण जखमी झालेत. यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र निदर्शने आणि घटनेचा संबंध नसून वैयक्तिक वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हल्लेखोर व्यक्ती फरार आहे.