नवी दिल्ली : गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.
पाकिस्तानला मागचे 24 तास नेहमी लक्षात राहतील. 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याने पाकिस्तानात सुरु असलेल्या बनावट नोटांच्या काळ्या धंद्याला चाप बसणार आहे. हा पैसा दहशवाद्यांना पुरवला जात होता. याच पैशातून मग भारतविरोधी कारवाया होत होत्या. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा वाजत आहे. कारण ट्रम्प यांचा पाकिस्तान विरोधातील सूर पाकिस्तानने निवडणूक प्रचारात पाहिला.
ट्रम्प यांनी भारत आणि भारतीय लोकं त्यांना पसंद असल्याचं बोलून दाखवलं होतं तर दहशतवादी विरोधातील लढाईसाठी देखील भारतासोबत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'पाकिस्तान हा एक अस्थिर देश आहे. पाकिस्तानकडे असलेली अणुशक्तीमुळे जग धोक्यात आहे. याचा सामना करण्यासाठी भारत अमेरिकेची मदत करु शकतो. पाकने ९/११ हल्ल्यानंतर अनेकदा विश्वासघात केला आहे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पाकिस्तानला प्रत्येक चुकीसाठी शिक्षा देईल.'
ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, भारताचे लोकं आणि त्यांचा देश शानदार आहेत. जगातील सर्वात मोठा डेमोक्रेटीक देश आहे. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर भारत-अमेरिका संबंध आणखी चांगले करेल. मी पंतप्रधान मोदींचा प्रशंसक आहे. मोदींनी इकोनॉमिक रिफॉर्म्स आणि ब्यूरोक्रेसीमध्ये बदल घडवत भारताला विकसीत करत आहेत. ते ऊर्जावान व्यक्ती आहेत. माझे खूप सारे भारतीय मित्र आहेत. ते सगळे अप्रतिम आहेत.'