ब्रुस्सेल : ब्रुस्सेल : बेल्जियमची राजधानी ब्रुस्सेल येथील विमानतळावर दोन तर तिसरा स्फोट मेट्रो स्टेशन जवळ झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या पहिल्या दोन स्फोटात ११ जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अद्याप स्फोटाचे कारण कळू शकले नाही. स्काय न्यूजने दिलेल्या माहितीनुसार हे स्फोट डिपार्जर च्या ठिकाणी झाले. अमेरिकन एअरलाइन्सच्या डेस्क जवळ हे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, बेल्जियम मीडियाने दिलेल्या माहितीनुसार एअरपोर्टकडे येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बेल्जियमच्या राजधानीतील मालबिक मेट्रो स्टेशनजवळ हा स्फोट झाला आहे.
ब्रुस्सेलच्या विमानतळावर झालेल्या स्फोटानंतर भारतीय विमान कंपनी असलेल्या जेट एअरवेजने आपले सर्व विमान सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.
#BREAKING: Two loud explosions at #Zaventem airport in #Brussels pic.twitter.com/JFw9RGLjnh
— Anna Ahronheim (@AAhronheim) March 22, 2016
PHOTO: Damage inside #Brussels airport main terminal after two large explosions - @wardmarkey pic.twitter.com/n0Zjo33A6m
— Conflict News (@Conflicts) March 22, 2016
PHOTO: #Brussels airport after two bombs go off - @Tabagari pic.twitter.com/2Rztm2HQSe
— Conflict News (@Conflicts) March 22, 2016
Explosión metro maalbeek pic.twitter.com/9KIEhLMOin
— Serge Massart (@massart_serge) March 22, 2016