न्यू यॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याला आज सुरुवात झाली असतानाच अमेरिकेतील एका कोर्टानं मोदींना गुजरात दंगलीसंदर्भात समन्स बजावलं आहे. हा समन्स मिळाल्यावर मोदींना त्यावर २१ दिवसांमध्ये उत्तर देणं बंधनकारक असणार आहे.
अमेरिकन जस्टीस सेंटर या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेवी संस्थेनं न्यू यॉर्कमधील फेडरल कोर्टात २००२ मधील गुजरात दंगलीसंदर्भात याचिका दाखल केली होती. गुजरातमधील दंगलीचे चटके बसलेल्या दंगलग्रस्तांच्या आधारे ही याचिका दाखल झाली होती. या याचिकेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.
या याचिकेवरील सुनावणी दरम्यान फेडरल कोर्टानं मोदींना समन्स बजावलं आहे. या याचिकेवर उत्तर न दिल्यास मोदींच्या विरोधातही निकाल दिला जाऊ शकतो, असं अमेरिकेतील कायदेतज्ज्ञांनी सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मोदी अमेरिकेला पोहोचण्याच्या २४ तासांपूर्वीच फेडरल कोर्टानं मोदींना समन्स बजावलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.