रियाद : सौदी अरबमधील स्थानिक निवडणुकीत महिलांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क मिळाला आणि शनिवारी या महिलांनी मतदानात सहभाग घेतला. महिलांना समानतेचा अधिकार देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पहिल्यांदा नगर पालिकांमध्ये महिलांना उमेदवार म्हणून उभे राहण्याची संधी देण्यात आली. मात्र अद्यापही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या करण्याचा महिलांना अधिकार नाही
१ सौदी अरेबियातील महिला एकट्या दुकट्या घराबाहेर पडू शकत नाही. या महिलांना घराबाहेर जायचे असल्यास एक पुरुष असणे आवश्यक असते.
२ या देशातील महिलांना वाहन चालवण्यास मनाई आहे. याबाबतचा कोणताही कायदा नसला तरी येथील समाजात महिलांना गाडी चालवणे मान्यता नाही
३ सौंदीमध्ये महिलांसाठी विशिष्ट ड्रेस कोड आहे. महिलांना हिजाब आणि बुरखा घालणे गरजेचे असते. सार्वजनिक ठिकाणी अधिक मेकअप आणि लहान कपड्यांमध्ये कोणती महिला ३ दिसली तर पोलीस त्यांना रोखू शकतात.
४ या देशातील कुटुंबातील पुरुष वगळता इतर पुरुषांशी जास्त बोलू शकत नाही. कार्यालये,बँका आणि विद्यापीठांमध्ये महिला आणि पुरुषांना बाहेर जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतात.
५ सार्वजनिक ठिकाणी स्विमिंग करु शकत नाहीत. ज्या स्विमिंग पूलमध्ये पुरुष स्नान करत असतील तेथे महिलांना स्विमिंग कऱण्यास बंदी आहे.
६ सौदीतील महिला खेळाडूंसाठीचे नियम कडक आहेत.
७ शॉपिंग करताना कपड्यांचे ट्रायल घेण्यासही सौदी देशातील महिलांना बंदी आहे. हे करताना कोणी महिला पकडली गेल्यास तिला शिक्षा होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.