सौदी अरेबियात पहिल्यांच 'महिलां'ना बजावला मतदानाचा हक्क

सौदी अरेबियात महिलांनी शनिवारी पहिल्यांच आपल्या मतधिकारांचा वापर केलाय. 

Updated: Dec 12, 2015, 07:52 PM IST
सौदी अरेबियात पहिल्यांच 'महिलां'ना बजावला मतदानाचा हक्क title=

मक्का : सौदी अरेबियात महिलांनी शनिवारी पहिल्यांच आपल्या मतधिकारांचा वापर केलाय. 

सौदी अरबच समाज रूढिवादी समाज म्हणून ओळखला जातो. हा जगातला एकटा असा देश आहे, जिथं महिलांना वाहन चालवण्याचा अधिकारही नाही. 
मात्र, आज पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महिलांना मतदानाच्या हक्कासोबतच निवडणुका लढवण्याचा अधिकारही देण्यात आला. 

निवडणुकीत ९७८ महिला आणि ५९३८ पुरूष उमेदवार उभे राहिलेत. प्रचारामध्ये महिलांनी पडद्याच्या मागूनच भाषण केले. काहींनी पुरूषांची मदत घेऊन प्रचार केला. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १ लाख ३० हजार महिलांनी नोंदणी केली आहे. पुरूषांची संख्या याहून खूपच अधिक म्हणजे तब्बल साडे १३ लाख आहे.  

महिलांना मतदानाचा हक्क मिळणे ही एक चांगली गोष्ट आहे, यामुळे महिलांना प्रतिनिधीत्व करण्यास वाव मिळेल, अशी प्रतिक्रिया यावेळी महिलांच्या मतदानाच्या हक्काविषयी नाव नोंदणीसाठी आलेल्या पहिल्या महिला सलमा अल राशेद यांनी व्यक्त केली. 

सौदी अरेबियात निवडणुका होणे ही खुप दुर्मिळ बाब आहे. १९६५ ते २००५ या ४० वर्षात कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. महिलांना मतदानाचा हक्क मिळायला हवा, अशी दिवंगत राजे अब्दुल्ला यांची इच्छा होती. शाह अब्दुल्ला यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी ३० महिलांची देशांचे सल्लागार म्हणून निवड केली. या निवडणुकांत नगर परिषेदेतील २१०० जागांसाठी मतदान घेण्यात आलं. उरलेल्या १०५० जागावर राजाच्या मंजुरीने नियुक्त्या होणार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.