त्यांनी मरणाचा अनुभव घेतला

मुंबई : एखादा मृतदेह मध्येच बोलू लागला तर तुमची काय अवस्था होईल? 

Updated: Mar 19, 2016, 05:33 PM IST
त्यांनी मरणाचा अनुभव घेतला  title=

मुंबई : एखादा मृतदेह मध्येच बोलू लागला तर तुमची काय अवस्था होईल? विचारही करवत नाहीये ना? पण, जर्मनीतील एका माणसावर ही वेळ आली. जर्मनीच्या गावातील एका वृद्धाश्रमात काम करणाऱ्या माणसाने तेथील एका ९२ वर्षीय महिलेची हालचाल होत नसल्याचे पाहिले. तिचा श्वासही चालू नसल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांना बोलवण्यात आले. डॉक्टरांनी त्या महिलेची तपासणी करताना नीट खातरजमा न करता तिला मृत घोषित केले.

त्यानंतर त्या महिलेच्या अंत्यसंस्कारांची तयारी करुन तिला एका दफनभूमीला नेण्यात आले. जेव्हा शवपेटीकडे तो माणूस बसला होता तेव्हा त्याला अचानक शवपेटीतून आवाज आला, 'मी कुठे आहे?'. हा आवाज ऐकून तो बेशुद्ध झाला. नंतर त्या दफनभूमीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आलं की शवपेटीतील महिला जीवंत आहे. 

तो मरणाला पाहून परतला
मध्यंतरी अशीच काहीशी घटना घडली अमेरिकेच्या मिसिसीपी राज्यात. इथल्या लेक्झिंग्टन शहरात विल्यम्स नावाच्या एका व्यक्तीला डॉक्टरांनी श्वासोच्छवास बंद झाल्याच्या कारणावरुन मृत घोषित केले. नंतर विल्यम्सला जेव्हा दफनभूमीत नेऊन त्यांच्या शरीराला एक लेप लावण्याची तयारी सुरू झाली तेव्हा विल्यम्सच्या शरीराची हालचाल होण्यास सुरुवात झाली आणि नंतर ते उठूनही बसले. त्याच्या अल्पकाळातील मृत्यूवेळचे अनुभव कसे होते याबद्दल मात्र विल्यम्स काही सांगू शकले नाही. 

...आणि ती सही दिवसांनी परतली 
चीनमध्येही काहीच दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली. चीनमधील गुआंक्शी प्रांतात ९५ वर्षीय महिलेचा हा किस्सा आहे. ली जियूफेंग नावाच्या महिलेचा श्वास अचानक बंद झाला. तिच्या नातवाने आपली आजी वारल्याने तिला एका शवपेटीत ठेवले. नातेवाईक येण्याची वाट बघत असल्याने त्याने तिचा दफनविधी करण्यास वेळ घेतला. सहा दिवसांनंतर मात्र ली उठून बसली. ली उठल्याने आजूबाजूचे लोक घाबरले. लीचे भूत तर आले नाही ना अशी भीती त्यांना वाटली. पण, नंतर ली जीवंत असल्याची खात्री त्यांना पटली.