दुबई : पठाणकोट हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर दबाव आणत आहे. त्याचवेळी भारत अवाजवी प्रतिक्रिया देत आहे. ती त्यांनी देऊ नये, असा सल्ला पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी दिलाय.
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याची आश्वासन पाकिस्तानने दिलेय. याशिवाय पठाणकोट हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्यासंदर्भात पाकिस्तानवर अमेरिकेचाही दबाव आहे. त्यानंतर मुशर्रफ यांनी हे मत व्यक्त केले.
भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश दहशतवादाचा सामना करत असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. याचबरोबर दहशतवादाचा बीमोड करण्यासंदर्भात भारत पाकिस्तानवर दबाव आणत असल्याचा आरोपही केला.