त्यांनी नाकारली सरकारची पेन्शन

सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे.

Updated: Jun 6, 2016, 06:45 PM IST
त्यांनी नाकारली सरकारची पेन्शन  title=

जिनिवा : सरकारकडून मिळणार असलेली पेन्शन सहसा कोणी नाकारणार नाही, पण स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी मात्र चक्क सरकारकडून मिळणारी पेन्शन नाकारली आहे. स्वित्झर्लंड सरकारनं पेन्शनच्या या योजनेसाठी एक जनमत चाचणी घेतली. या चाचणीमध्ये पेन्शनच्या बाजूनं 23 टक्के तर पेन्शनच्या विरोधात 77 टक्के नागरिकांनी मतदान केलं. 

स्वित्झर्लंड सरकारनं नागरिकांना महिन्याला दीड लाख रुपये पेन्शन द्यावी अशी मागणी गेल्या दीड वर्षापासून सुरु होती, म्हणून सरकारला ही जनमत चाचणी घ्यावी लागली. स्वित्झर्लंडमधले अनेक जण बेरोजगार झाले आहेत. या देशातल्या कंपन्यांमध्ये माणसांऐवजी रोबोट काम करत आहेत. 

पेन्शनचा हा प्रस्ताव पास झाला असता तर स्वित्झर्लंड सरकारला देशाचे नागरिक तसंच तिकडे पाच वर्षांपेक्षा जास्त राहणाऱ्या परदेशी लोकांना ही पेन्शन द्यावी लागली असती.