मॉस्को : रशियाच्या एका सरकारी चॅनलने दावा केला की सिरीयावर बॉम्ब हल्ले करण्यासाठी हा चांगला मौसम असल्याची काळजी घेण्यात आली होती. सरकारी चॅनल 'रोसियन २४' ने सिरीयावर रशियाच्या हल्लाचे कव्हरेज करताना म्हटले आहे.
एका महिला न्यूज अँकरने टीव्हीवर म्हटले की ऑक्टोबरमध्ये सिरीयामध्ये हवामान विमान उड्डाणसाठी योग्य असते. एका बॉम्बने बेचिराख झालेल्या फोटोच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या या न्यूज अँकरने म्हटले की आता आदर्श वातावरण आहे.
स्क्रिनवर हेडलाइन सुरू होती 'फ्लाइंग वेदर' शनिवारी प्रेक्षकांना सांगितले की आकाशात ढग असल्याने विमान उड्डाण करण्यास अडचणी येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.