लंडन : 'ब्लड मून'मुळे जग संपणार असल्याचे आवई खोटी ठरल्यानंतर एका आठवड्याच्या आता आता पुन्हा एक जग संपण्याची भविष्यवाणी समोर येत आहे. ईबायबल फेलोशिप लिडर मॅकनन यांनी भविष्यवाणी केली की जग येत्या ७ ऑक्टोबरला म्हणजे उद्या नष्ट होणार आहे.
'द गार्डियन' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार मागील 'ब्ल़ड मून' पासून सप्टेंबरमध्ये आपण वाचलो पण ७ ऑक्टोबर रोजी आपली पृथ्वी नक्की नष्ट होणार असल्याचा इशारा वजा भविष्यवाणी एका ख्रिश्चन संस्थेने केली आहे.
इबायबल फेलोशिप, ही ऑनलाइन संलग्न संस्था असून त्यांचे फिलाडेफिया येथे हेडक्वॉर्टर आहे. यापूर्वीही या संस्थेने सांगितले होते की २१ मे २०११ रोजी जग नष्ट होणार आहे. पण आता अत्यंत ठामपणे ही संस्था सांगते आहे की आताची तारीख खरचं योग्य आहे.
बातम्यांनुसार फेलोशिपचे संस्थापक क्रिश मॅकनन यांनी सांगितले की, बायबलमधून ज्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यानुसार सात ऑक्टोबरला स्वतः ईश्वराने संकेत दिले आहे. या दिवशी जग संपणार आहे. पृथ्वी कायमची संपणार आहे आणि त्याचा विनाश होणार आहे.
मॅकनन यांनी बायबलमधील व्याख्येनुसार सांगितले की, आगेच्या ज्वाळानी जळून पृथ्वी खाक होणार आहे.
यापूर्वीच्या भविष्यवाणींवर नजर टाकली असता २७ सप्टेंबरला पृथ्वीची छाया चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते. या खगोलिय घटनेला 'ब्लड मून' म्हटले जाते. या ग्रहणाच्या काळात चंद्र लाल दिसतो. या घटनेनंतर काही धार्मिक संस्थांनी आपली पृथ्वी नष्ट होणार असे सांगितले होते. पण तसं काही झालं नाही.
मॅकनन यांच्यानुसार ईश्वराने यापूर्वी पृथ्वीचा नाश पाण्याने केला होता. पण आता नाश पाण्याने करणार नाही, पण आता आगीच्या माध्यमातून नाश करणार आहे.
पृथ्वीच्या विनाशाबाबत वेगवेगळी मत आहे. ख्रिश्चनांकडून झालेल्या या दाव्यानंतर वैज्ञानिकांनी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पृथ्वीच्या नाशाबद्दल सर्वात सर्वसामान्य गोष्ट आहे ती म्हणजे तापमान वाढून नाश होणार आहे. तसेच सूर्याचा इतका विस्तार होईल त्यात पृथ्वी जळून खाक होईल. काही वैज्ञानिकांनुसार असे व्हायला अजून ७.६ अब्ज वर्ष लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.