'भारतरत्न' वाजपेयींसाठी पाकिस्तानातून आलं खास गिफ्ट

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा गुरुवारी ९१  वा वाढदिवस होता... तसंच हा दिवस त्यांच्यासाठी आणखी खास बनवत भारत सरकारनं अटलजींना 'भारतरत्न' पुरस्काराची घोषणा केली. याच निमित्तानं शेजारील देश असलेल्या  पाकिस्तानातूनही अटलजींसाठी एक खास गिफ्ट आलं.

Updated: Dec 26, 2014, 07:58 AM IST
'भारतरत्न' वाजपेयींसाठी पाकिस्तानातून आलं खास गिफ्ट title=

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा गुरुवारी ९१  वा वाढदिवस होता... तसंच हा दिवस त्यांच्यासाठी आणखी खास बनवत भारत सरकारनं अटलजींना 'भारतरत्न' पुरस्काराची घोषणा केली. याच निमित्तानं शेजारील देश असलेल्या  पाकिस्तानातूनही अटलजींसाठी एक खास गिफ्ट आलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासाठी एक पुष्पगुच्छ भारतात धाडून अटलजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेले्या अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या वयाची ९० वर्ष पूर्ण केलीत.

खास गोष्ट म्हणजे, याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही वाढदिवस असतो. नवाझ शरीफ यांचा जन्म २५ डिसेंबर १९४९ रोजी लाहोरमध्ये झाला होता. या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल वेबसाईट ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.