फोर्तालेजा (ब्राझील) : ब्राझील दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे अध्यक्ष सी जिनपिंग यांची भेट घेतली.
तब्बल 80 मिनिटं चाललेल्या या बैठकीत उभय देशांमध्ये असलेल्या सीमाप्रश्वावर सविस्तर चर्चा झाली. यावर सामंजस्यानं तोडगा काढून जगासमोर एक आदर्श निर्माण करावा, असं मोदी यावेळी म्हणाले. ब्राझीलमधल्या फोर्टालेझा इथं ही बैठक झाली. नंतर मोदींनी चांगली बैठक आणि चांगली चर्चा झाल्याचं ट्विट केलं.
सीमाप्रश्न सोडवायचा असेल तर सहकार्य आणि विश्वास वाढवावा लागेल, असं मोदींनी जिनपिंग यांना यावेळी सांगितलं. तिबेटमधल्या मानसरोवर यात्रेसाठी आणखी एक मार्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मोदींनी यावेळी ठेवला यावर विचार करण्याचं आश्वासन जिनपिंग यांनी दिलंय.
Had a very fruitful meeting with Chinese President Mr. Xi Jinping. We discussed a wide range of issues pic.twitter.com/dL6n0p17TO— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2014
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.