धोरणांचा फेरविचार करावा लागेल, मोदींनी चीनला खडसावलं!

भारत आणि चीनदरम्यान दीर्घकालीन सहकार्य होणं गरजेचं असेल, तर चीनला आपल्या काही धोरणांचा फेरविचार करावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगनची कानउघडणी केलीय.

Updated: May 16, 2015, 10:17 AM IST
धोरणांचा फेरविचार करावा लागेल, मोदींनी चीनला खडसावलं! title=

बीजिंग : भारत आणि चीनदरम्यान दीर्घकालीन सहकार्य होणं गरजेचं असेल, तर चीनला आपल्या काही धोरणांचा फेरविचार करावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगनची कानउघडणी केलीय.

आपल्या चीन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी चीनी पंतप्रधान ली कुआंग यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये तब्बल २४ करार झालेत. रेल्वे, पायाभूत सुविधा, व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये तब्बल ६३ हजार कोटीं रुपयांचे करार करण्यात आलेत. यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी मैत्रीच्या आणाभाका घेतल्या असल्या तरी मोदींनी चीनला दिलेला इशारा जास्त महत्त्वाचा आहे... भारत आणि चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर करावा, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केलीयं.
 
बघुयात कोणकोणत्या क्षेत्रात भारत-चीनदरम्यान करार झालेत ते... 

  • गुजरात, महाराष्ट्र ट्रेड पार्कसाठी करार

  • भारत-चीन रेल्वे विकास करार

  • भूकंप विज्ञान विकासाबाबत करार 

  • शैक्षणिक आदान प्रदान 

  • कौशल्य विकासाबाबत करार 

  • पर्यटन विकासावर दोन्ही देश भर देणार 

  • खाण क्षेत्राबाबत करार

  • दूरदर्शन आणि सीसीटीवी  प्रसारणाबाबत करार 

  • भूविज्ञान आणि अंतराळ संशोधन  सहकार्य

  • डेवलपमेंट रिसर्च सेंटर आणि नीति आयोगाबाबत करार

  • भारत-चीन थिंक टँक स्थापनेसाठी करार

  • चीन-चेन्नईत, भारत-शेन्गडूमध्ये वाणिज्य दूतावस स्थापन 

  • औरंगाबाद-डूनहुआंगमध्ये सिस्टर सिटीज संबंध

  • कर्नाटक-शिचुआनमध्ये सिस्टर स्टेट संबंध

  • योग कॉलेज स्थापनेसाठी करार

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.