कैद्यांना नाईलाजाने खावे लागतायंत उंदीर

माणूस काही काळ उपाशी राहु शकतो. पण ठराविक काही काळानंतर त्याला भूकवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊन जाते. माणूस मग जे मिळेल ते खाणे पंसद करतो.

Updated: Jan 12, 2016, 03:43 PM IST
कैद्यांना नाईलाजाने खावे लागतायंत उंदीर title=

हरारे : माणूस काही काळ उपाशी राहु शकतो. पण ठराविक काही काळानंतर त्याला भूकवर नियंत्रण ठेवणे अशक्य होऊन जाते. माणूस मग जे मिळेल ते खाणे पंसद करतो.

झिम्बाबे येथील आम्ही तुम्हाला अशी घटना सांगणार आहोत ज्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे कैद्याना चक्क उंदीर खावे लागतात. तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्यांची जेव्हा चौकशी सुरू होती तेव्हा ही गोष्ट लक्षात आली.

न्यायालयासमोर जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा सगळ्यांचेच डोळे उंचावले असतील. कैद्यांना चांगलं पाणी देखील मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भूकेने व्याकूळ कैद्यांना तुरुंगातील उंदीर खाण्याशिवाय पर्याय नाही.

एका कैद्याने मात्र तरुंगात धान्याची कमी नसल्याचं म्हटलंय. पण देश हा एका कठीण परिस्थितीतून जात असल्याचं त्यानं म्हटलं आहे आणि तुरुंग त्याला अपवाद नाही.