पाहा: बिकिनी बेब ते बुरखाधारी दहशतवादी!

फ्रान्समध्ये शार्ली हेब्डो मॅगझिनवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या टेररिस्ट ग्रुपमध्ये एका तरूणीचाही समावेश होता. तिनं आता फ्रान्सबाहेर पोबारा केलाय. कधीकाळी बिकिनी घालणारी ही सुंदरी बुरखाधारी दहशतवादी कशी बनली? जाणून घ्या...

Updated: Jan 13, 2015, 09:49 PM IST
पाहा: बिकिनी बेब ते बुरखाधारी दहशतवादी! title=

पॅरिस: फ्रान्समध्ये शार्ली हेब्डो मॅगझिनवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या टेररिस्ट ग्रुपमध्ये एका तरूणीचाही समावेश होता. तिनं आता फ्रान्सबाहेर पोबारा केलाय. कधीकाळी बिकिनी घालणारी ही सुंदरी बुरखाधारी दहशतवादी कशी बनली? जाणून घ्या...

बीचवर बिकिनीमध्ये मौजमजा करणाऱ्या तरूणीचे हे पाच वर्षांपूर्वीचे फोटो... पॅरिसमध्ये आपल्या दहशतवादी प्रियकरासोबत रोमान्स करणारी ही सुंदरी... प्रेमात ती एवढी आंधळी झाली की, तिनं बिकिनीची कुर्बानी दिली... आणि हातात बंदूक उचलली...

आता फ्रेंच पोलीस तिचा शोध घेण्यासाठी दिवसरात्र एक करतायत..

तिचं नाव हयात बौमैडीन... वय २७ वर्ष... ती फ्रान्सची नागरिक असली तरी मूळची अल्जेरियाची आहे...

७ जानेवारीला शार्ली हेब्डो मॅगझिनवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हयातचाही सहभाग होता, असा फ्रान्स पोलिसांचा दावा आहे. एवढंच नव्हे तर ९ जानेवारीला सुपरमार्केटमध्ये हयातचा दहशतवादी पती अमेडी कॉलीबेली फ्रेंच पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. त्यावेळी दारूगोळा आणि खतरनाक शस्त्रास्त्रं घेऊन हयात देखील घटनास्थळी हजर होती. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ती सिरीयाला फरार झाल्याचं सांगितलं जातंय.

हयात कशी बनली दहशतवादी?
फ्रान्सची मोस्ट वाँटेड महिला दहशतवादी बनलेल्या हयातचं आयुष्य ५ वर्षांपूर्वी एकदम वेगळं होतं.

१९८८ मध्ये जन्मलेल्या हयातचे वडील मोहम्मद डिलीवरी ड्रायव्हर होते. १९९४ मध्ये आईचा मृत्यू झाल्यानंतर वडिलांनी तिला केयर होममध्ये ठेवलं. मोठी झाल्यानंतर तिनं कॅशियरची नोकरी करायला सुरूवात केली. तेव्हा तिची ओळख अमेडी कॉलीबेलीशी झाली. प्रेमात आकंठ बुडालेल्या हयातनं ५ जुलै २००९ मध्ये अमेडीशी निकाह केला. तेव्हापासून ही बिकीनी बेब बुरखा घालायला लागली.

ते दोघेही बेगनेक्स भागात राहत होते. धार्मिक दाम्पत्य अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यांचा खरा चेहरा जगासमोर आला, तेव्हा सर्वांनाच जबर धक्का बसला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.