www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानमध्ये दोन कबिल्यांमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी १३ अल्पवयीम मुलींची अदालाबदली करण्यात आली. विशेष म्हणजे या परिषदेला पाकिस्तान संसदेचे सदस्य उपस्थित होते. या प्रकरणाबाबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करत अशा प्रकार निष्पाप मुलींचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या डेरा बुगती जिल्ह्यात गेल्या महिन्यात ही परिषद पार पडली. त्यावेळी खासदार मीर तारीक मसुरी या परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी दोन कबिल्यांमध्ये वाद सुरू होता. या वाद मिटवण्यासाठी त्यांनी ४ ते १६ वर्षाच्या १३ मुलींची अदलाबदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणाचा खुलासा झाल्यावर बलुचिस्तानची राजधानी क्वेटाच्या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सुमोटो कारवाई करत न्या. इफ्तिखार चौधरी यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मसूरी आणि इतर सदस्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे.