www.24taas.com, इस्लामाबाद
शांततेसाठी लढा देणाऱ्या एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर तालिबानी दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला. देशात ब्लॉगिंगच्या माध्यमातून ती शांततेसाठी प्रयत्न करीत आहे. या हल्ल्यात ती जखमी झाली आहे.
मलाला युसुफझाई ही विद्यार्थिनी पाकिस्तानमध्ये शांततेसाठी काम करत आहे. दहशतवाद्यांनी मलालाबद्दल माहिती विचारली आणि तिच्या मोटारीवर गोळीबार केला. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नासली तरी हा हल्ला तालिबानी दहशतवाद्यांनी केल्याचे म्हटले जात आहे.
मलाला हिच्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. मलाला हिच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शांततेसाठी चांगले काम करणाऱ्या विद्यार्थीवर हा भ्याड हल्ला केल्याची टीका होत आहे.
स्वात खोऱ्यामध्ये करण्यात आलेल्या शाळेच्या बाहेर दहशतवाद्यांनी तिच्या मोटारीवर गोळीबार केला. या घटनेत तिला दोन गोळ्या लागल्या. या हल्ल्यात अन्य दोन मुलेही जखमी झाले आहेत. मात्र, मलालाची प्रकृती गंभीर असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.