मुलाला नाही तर मुलगी बख्तावरला राजकारणात लॉन्च करणार झरदारी

पाकिस्तानात बिलावल भुट्टोच्या जागी त्याची बहिण बख्तावर भुट्टोला राजकारणात आणण्याची तयारी त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी चालवलीय. बिलावल सक्रीय राजकारणात आपली कोणतीही भूमिका दाखवू शकला नाहीय.

Updated: Apr 2, 2015, 09:10 AM IST
मुलाला नाही तर मुलगी बख्तावरला राजकारणात लॉन्च करणार झरदारी title=

इस्लामाबाद: पाकिस्तानात बिलावल भुट्टोच्या जागी त्याची बहिण बख्तावर भुट्टोला राजकारणात आणण्याची तयारी त्यांचे वडील आसिफ अली झरदारी यांनी चालवलीय. बिलावल सक्रीय राजकारणात आपली कोणतीही भूमिका दाखवू शकला नाहीय.

पाकिस्तानच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीची परिस्थिती काहीशी भारतातील काँग्रेस पक्षासारखी झाल्याचं दिसतंय. जसे भारतात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेले आहेत. तसेच पाकिस्तानात पीपीपीचे चेअरमन बिलावल भुट्टो सुद्धा सुट्टी साजरी करतायेत.

राहुल गांधी १९ एप्रिलला परतणार असल्याचं सांगितलं जातंय. मात्र पाकिस्तानात तर बिलावलच्या जागी मुलगी बख्तावरला राजकारणात आणण्याचा निर्णय झरदारी यांनी केलाय. काँग्रेसमध्येही राहुल ऐवजी प्रियंका गांधीकडे नेतृत्व देण्याची मागणी अनेक कार्यकर्ते, नेते करतांना दिसतात. 

बिलावल भुट्टोनं गेल्यावर्षी पाकिस्तानच्या सक्रीय राजकारणात पाय ठेवला होता. मात्र काहीच दिवसांमध्ये त्यांचे पार्टीचे उपाध्यक्ष आणि वडील आसिफ अली झरदारींसोबत मतभेद झाले. मतभेद इतके की, बिलावल पक्ष सोडून सरळ लंडनला गेले आहेत. म्हणून बिलावलच्या जागी मुलगी बख्तावरला राजकारणात आणण्याचं झरदारींनी ठरवलंय. यासाठी ४ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आलीय. ४ एप्रिलला पीपीपीचे संस्थापक आणि बख्तावरचे आजोबा जुल्फीकार अली भुट्टो यांची पुण्यतिथी आहे. तिथं त्यावेळी बख्तावर भाषण देणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.