लंडन : दहशदवादी आणि विद्रोही कारवायांमध्ये सक्रीय असणाऱ्या धोकादायक देशांच्या यादीत पाकिस्तान आठव्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.
मार्च २०१५ पर्यंतच्या स्थितीनुसार इंटेलसेंटरच्या अव्वल दहा धोकादायक देशांच्या यादीत इराक पहिल्या स्थानावर आहे. तर सीरिया दुसऱ्या स्थानावर आहे. तसंच पश्चिम आशियाला सर्वात धोकादायक क्षेत्र ठरवण्यात आलं आहे.
इंटेलसेंटरच्या 'कंट्री थ्रेड इंडेक्स'द्वारे दहशदवादी आणि विद्रोही कारवाया व्यतिरिक्त इतर अनेक घटनांच्या आधारे कंट्री थ्रेड इंडेक्स निश्चित केला जातो. कंट्री थ्रेड इंडेक्स जास्त असलेले देश धोकादायक ठरवले जातात. भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानचा कंट्री थ्रेड इंडेक्स १२२ आहे, तर अफगाणिस्तानचा १८६ आहे.
कंट्री थ्रेड इंडेक्सनुसार अव्वल दहा देश :
१) इराक २) सीरिया ३) नायजेरिया ४) सोमालिया
५) अफगाणिस्तान ६) लीबिया ७) यमन ८) पाकिस्तान ९) यूक्रेन १०) मिस्र
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.