न्यूयॉर्क: पाकिस्ताननं नागरिकांसाठी पाणी आणि स्वच्छ वातावरण पुरवण्याच्या बाबतीत भारताला खूप मागे सोडले आहे. हा खुलासा शुक्रवारी एका कामगिरी निर्देशांकात झाला आहे.
अमेरिकेच्या ग्लोबल पब्लिक हेल्थच्या नॉर्थ कॅरोलिनाच्या 'द वॉटर इन्स्टिट्युट'तर्फे प्रकाशित केलेल्या निर्देशांकात पाकिस्तान पाचव्या क्रमांकावर आहे, तर भारत ९२व्या स्थानावर आहे. मात्र भारताला ९२वावं स्थान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छ भारत अभियाना'पूर्वी मिळालं आहे.
या यादीत सर्वात वरच्या स्थानावर चीन, अल-सल्वाडोर, नाइजर, मिस्र आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. तर सर्वात खालच्या स्थानावर रशिया, फिलिपाईंस आणि ब्राझिल हे देश आहेत.
या निर्देशांकात राष्ट्राचा आकार आणि उत्पन्नाचीही तुलना करण्यात आली आहे. त्यावरून हे स्पष्ट होते की, राष्ट्राचं उत्पादन नागरिकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वातावरण पुरवण्यात असफल होत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.