उत्तर कोरियाने केले पाण्यातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण

उत्तर कोरियाने पाण्याच्या आतून मारा करणाऱ्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले.

Updated: May 9, 2015, 01:19 PM IST
उत्तर कोरियाने केले पाण्यातून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण title=

सोल: उत्तर कोरियाने पाण्याच्या आतून मारा करणाऱ्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले.

कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसीच्या अधिकृत माहितीनुसार, या क्षेपणास्त्राला उत्तर कोरियाने विश्व स्तरीय युद्ध नितिविषयक हत्यार घोषित केले आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांनी या क्षेपणास्त्रांच्या परीक्षणाचे आदेश दिले होते. क्षेपणास्त्राचं परीक्षण एका पानबुडीद्वारे करण्यात आले आहे.

या क्षेपणास्त्राचा विकास कोरियन पीपल्स आर्मीचे सर्वोच्च कमांडर किम जोंग याच्या पुढाकाराने करण्यात आला. हे क्षेपणास्त्र सैन्याच्या विज्ञान तसेच तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.