पेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले

 पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला. 

Updated: Dec 17, 2014, 09:07 PM IST
पेशावर स्कूल हल्लाः दाऊद सोडून ठार झाले ९ वीतील सर्व मुले title=

पेशावर :  पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी स्कूलमध्ये झालेल्या रक्तरंजीत तांडवात ९ वी इयत्तेतील एक वर्गातील सर्व मुले ठार झालीत, पण दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक मुलगा वाचला. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही आणि घरीच राहिल्यामुळे या हल्ल्यातून तो बचावला. 

या हल्ल्यातून जो वाचला त्याचे नाव ऐकल्यावर तुम्हांलाही धक्का बसेल. त्या १५ वर्षीय मुलाचे नाव आहे दाऊद इब्राहीम... या विद्यार्थ्याला सोडून वर्गातील सर्व मुले मारली गेलीत. घटनेच्या सकाळी दाऊद घड्याळ्याच्या अलार्मवर उठला असता तर तो त्या मृतदेहांच्या ढिगाऱ्यात सापडला असता. पण अलार्म वाचला नाही आणि त्याचा जीव वाचला. 

सोमवारी रात्री दाऊदच्या घरी एक लग्न होते. त्यामुळे रात्रीच्या जागरणामुळे तो सकाळी उठू शकला नाही आणि शाळेत गेला नाही. दाऊद आपल्या वर्गातील एकमेव विद्यार्थी आहे जो जिवंत आहे. हल्ल्यात त्याचे सर्व मित्र मारले गेले आहेत. या हल्ल्यानंतर दाऊद पुरता हादरला आहे. 

पाकिस्तानातील या दहशतवादी हल्ल्यातील जखमींपैकी सात जणांनी आज प्राण गमावले. त्यामुळे मृतांचा आकड़ा १४८ झाला आहे. या हल्ल्यात १३२ विद्यार्थी ठार झाले आहेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.