26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका

लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे.

Updated: May 20, 2016, 11:14 PM IST
26/11 हल्ला प्रकरणी लखवीला झटका title=

इस्लामाबाद: लष्कर-ए-तोयबाचा नेता आणि कुख्यात दहशतवादी झकी-ऊर-रेहमान लख्वीवर पाकिस्तानच्या कोर्टात खटला चालणार आहे. मुंबईवरील 26-11 हल्ल्याबाबत हा खटला चालणार असून हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर लागणार आहे. या हल्ल्यात 166 जणांचा जीव गेला होता. 

पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी कोर्टानं हा निर्णय दिला आहे. पण या खटल्याला भारत सरकारमुळे उशीर होत असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 मे ला होणार आहे. 

भारतातल्या साक्षीदारांना खटल्यासाठी पाकिस्तानात पाठवण्याची मागणी पाकिस्ताननं केली आहे. पण भारताकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे गेल्या सात सुनावण्या होऊ शकल्या नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे.