आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर

Updated: Feb 20, 2016, 04:38 PM IST
आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर title=

चेरॉनची नवी छायाचित्र प्रसिद्ध 

न्यूयॉर्क : नासानं प्लेूटोचा उपग्रह चेरॉनची नवी छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या छायाचित्रानुसार त्याठिकाणी कधीकाळी समुद्र असल्याचं समजतंय. ही छायाचित्र जुलै 2015 मध्ये नासाच्या न्यू हॉरीजन स्पेस क्रॉफ्टनं पाठवली होती. 

ब्रिटनमध्ये गॅस लीक झाल्यामुळे स्फोट

ब्रिटनमधील नॉर्थ यॉर्कशायरच्या हेक्सबाय शहरात स्फोटामुळे ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. हा स्फोट गॅस लीक झाल्यामुळे झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, त्यामुळे शेजारी घराच्या खिडक्याही तुटल्या. 

चीनमध्ये अॅप्पल पे सेवा

कॅनडा अॅप्पलनं आपली अॅप्पल पे सेवा चीनमध्ये लाँच केली. ही सेवा चायना युनियन पेसह लाँच करण्यात आली. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानंतर चीन पाचवा देश आहे ज्याठिकाणी अॅप्पल पे सेवा लाँच केली गेली. 

...तर जर्मनी कठोर पावलं उचणार

गरजेहून अधिक शरणार्थी पाठवले गेल्यास जर्मनी कठोर पावलं उचलेल असा इशारा गृहमंत्री थॉमस डे मॉईजेर यांनी दिलाय. काही देश त्यांची जबाबदारी जर्मनीवर टाकत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जर्मनीननं आपल्या देशात गेल्यावर्षी जवळपास 11 लाख शरणार्थींना शरण दिली होती. 

तो आमचा भाग : चीन

दक्षिण चीन सी-चीनचा भाग असल्याचं चीननं स्पष्ट केलंय. अनेक देशांना आपला इतिहास सुधारण्याची आवश्यकता असल्याचंही चीननं म्हटलंय. चीननं झीशा आयलंडमध्ये मिसाईल आणि चीन टापूला मिलेट्राईज केल्याचं अमेरिकनं म्हटलं होतं. त्याविरोधात चीननं हे उत्तर दिलंय. 

अमेरिकेचा हल्ला. ४० ठार

अमेरिकेच्या वायुसेनेनं पश्चिम लिबियात आयसीसीच्या ठिकाणांवर हवाई हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये जवळपास ४० जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. 

निरपराध नागरिकांविरोधात अमेरिकी शस्त्रे

अमेरिकेकडून विक्री केलेल्या हत्यारांचा वापर हा टर्कीच्या निरपराध नागरिकांविरोधात होत असल्याचा आरोप टर्कीच्या राष्ट्रपतींनी केलाय. आत्मघाती हल्ल्यात या नागरिकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासंदर्भात टर्कीचे राष्ट्रपती बराक ओबामांशी चर्चाही करणार आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात

अमेरिकेच्या प्रेसिडेंशियन इलेक्शनच्या रिप्बलिकन उमेदवार बनण्याच्या शर्यतीत असलेले डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकलेत. पोप फ्रान्सिस यांनी ट्रम्प आपल्या वक्तव्यामुळए सच्चे ख्रिश्चियन नसल्याचा आरोप केला होता. यावर ट्रम्प यांनी पोप फ्रान्सिस यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. 

रशियन सैनिकांचा सराव

रशियन सैनिकांनी आपल्या कॉम्बेट हेलिकॉपटर्ससह सैनिकी सराव केलाय. हा सराव दक्षिण रशियातील क्रॉसनोडोरमध्ये करण्यात आला. 

पॅलेस्टाईन पत्रकारांचे उपोषण

पॅलेस्टाईन पत्रकार गेल्या तीन महिन्यांपासून उपोषणाला बसलेत. मोहम्मदनं आपलं उपोषण इस्त्राईलच्या अॅमिनिस्ट्रेटिव्ह डीटेन्शनच्या विरोधात केलंय. मोहम्मदची प्रकृती ढासळत चालल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.