कच्च्या तेलाच्या दरात आणखी मोठी घसरण

कच्च्या तेल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कदाचित वाहन चालकांसाठी काही दिवसांनी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

Updated: Feb 19, 2015, 05:40 PM IST
कच्च्या तेलाच्या दरात आणखी मोठी घसरण title=

वॉशिंग्टन : कच्च्या तेल्याचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, पेट्रोल-डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कदाचित वाहन चालकांसाठी काही दिवसांनी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

अमेरिकेने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवल्याने परत एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत तीव्र घसरण दिसून आली आहे. 

ब्रेंट क्रूडचे भाव ६० डॉलर्स प्रति बॅरलपेक्षा जास्त घसरले आहेत, तर नायमॅक्स क्रूड २.७५ टक्के घसरणीसह ५१ डॉलरपेक्षा खालच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सध्या नायमॅक्स क्रुड २.८४ टक्क्यांनी घसरून ५१.३२ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत असून ब्रेंट क्रुड ०.७५ टक्क्यांनी घसरून ५९.५४ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.