नॉर्वेमध्ये ई- सिगारेटच्या जाहिरातीवर बंदी

नॉर्वे सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटच्या सगळ्या विक्रेत्यांना आपल्या वेबसाइटवरून ई- सिगारेटचे सगळे फोटो तसेच संबंधित सकारात्मक रिव्हुजला काढून टाकण्याची सूचना केली आहे.

Updated: Jul 28, 2015, 02:18 PM IST
नॉर्वेमध्ये ई- सिगारेटच्या जाहिरातीवर बंदी title=

ऑस्लो : नॉर्वे सरकारने इलेक्ट्रॉनिक सिगरेटच्या सगळ्या विक्रेत्यांना आपल्या वेबसाइटवरून ई- सिगारेटचे सगळे फोटो तसेच संबंधित सकारात्मक रिव्हुजला काढून टाकण्याची सूचना केली आहे.

ई - सिगारेट हे तंबाखूचे एक सारखे स्वरूप आहे आणि म्हणूनचं याच्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे. असे वक्तव्य नॉर्वेतील आरोग्य संचनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले आहे.

ई- सिगारेटवरील जाहिरातीवरील अशा बंदीमुळे त्याचा परिणाम उद्योगावर होईल, अशी भिती विक्रेत्यांना वाटू लागली आहे.

ई- सिगारेट हे बॅटरीवर चालणारे उपकरण आहे. याचे सेवन केल्यावर यात असणाऱ्या पदार्थांचा धुरात बदल होतो, ज्यामुळे याचे सेवन धुप्रपानासारखे वाटते. 

कॅन्सरचे कारण बनण्यासाठी जी रसायने सामान्य सिगरेटमध्ये आहेत, ती ई- सिगरेटमध्ये नाहीत पण यात निकोटीनचे प्रमाण आहे. ई- सिगरेटचे आरोग्यावर होणाऱ्या हानिकारक प्रभावांबद्दल अजून अचूक माहिती मिळाली नाही, तरी तंबाखूच्या तुलनेत ई- सिगरेट कमी हानिकारक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.