अमेरिकेला प्रत्युत्तरासाठी उ. कोरियाचे रॉकेट सज्ज

अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 29, 2013, 01:29 PM IST

www.24taas.com, सेऊल
अमेरिकेची मुख्य भूमी तसेच दक्षिण कोरियाच्या सैन्य छावण्यांवर रॉकेट हल्ला करण्यासाठी तयारी करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे नेता किम जोंग यांनी दिले आहे.

किम यांनी उत्तर कोरियाच्या लष्कर अधिकाऱ्यांची काल रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी हे आदेश देण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या संयुक्त सैन्य अभियानाला जशासतसे उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेच्या अण्वस्त्र सक्षम यूएस बी-२ रडारपासून वाचणारे आणि बॉम्ब फेक करणाऱ्या विमानांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अमेरिका आम्हांला उत्तेजित करीत आहे. त्यामुळे उत्तर कोरियाला अमेरिकेची मुख्य भूमी, हवाई , गुआम, दक्षिण कोरिया आणि प्रशांत महासागरातील सैनिकी छावण्यांवर हल्ला करायला हवा, असे किम यांनी म्हटल्याचे कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे.