www.24taas.com झी मीडिया, लंडन
नेटवर्किंग साइटवर येणाऱ्या अश्लील किंवा धमकी देणाऱ्या व्यक्तीना पकडण्यासाठी आता ‘रिपोर्ट अब्यूज’ नावाचे एक बटन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा इंग्लडच्या ट्विटर कार्यालयाने केली आहे.
इंग्लंडमधील काही प्रसिध्द महिलांनाच्या समुहाला ट्विटर या नेटवर्किंग साइटवरून मारून टाकण्याची धमकी आली असल्याने हा उपाय सुरू केला जाणार आहे. इंग्लंडमधील ट्विटर कार्यालयाने त्या महीलांची माफी मागून ही घोषणा केली आहे, जेणेकरून लोकांची या धमक्यांपासून सुटका होईल.
ट्विटर कार्यालयाच्या आधिकाऱ्यांनी अशी घोषणा केली आहे की, अभद्र अशा धमक्यापासून सूटका मिळविण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना नियुक्त केले जाणार आहे. त्यांनी हेदेखील संगितले आहे की, पुढे येणाऱ्या नवीन आईफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅप्सवरदेखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
कॉनेडाच्या एका सीबीसीन्यूज वृत्तवाहिनीनुसार, इंग्लंडमध्ये महिला अधिकार यासाठी काम करणाऱ्या काही कार्यकर्त्या तसेच काही संस्थेमध्ये काम करणाऱ्या सदस्या आणि महिला पत्रकार यांना येणाऱ्या अभद्र धमक्यांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
याआधी लंडनमध्ये अशी घटना घडून गेली आहे. महिलांसाठी काम करणारी एक कार्यकर्ती कॅरोलीन क्रिएडो पेरेज हिच्या विरोधात बेकायदा कृत्य करण्याची धमकी देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.