www.24tass.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
मंगळ... याच लालग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी पाणी अस्तित्वात होतं... याचे धडधडीत पुरावेच आता नासाच्या हाती लागले आहेत. याच ग्रहावर कित्येक वर्षांपूर्वी जीवसृष्टीही अस्तित्वात होती, असा नासाचा कयास आहे.
नासाने मंगळावर पाठवलेल्या `अपॉर्च्युनिटी रोवर`नं केलेल्या नवीन परिक्षणानुसार चार अरब वर्षांपूर्वी मंगळावर पाणी होतं, असं आता पुराव्यानिशी सिद्ध झालंय. मंगळावर जीवसृष्टीच्या शोधात असलेल्या नासाच्या `अपॉर्च्युनिटी रोवर`नं ही माहिती गोळा केलीय.
नासाच्या वैज्ञानिकांनी अपॉर्च्युनिटी रोवरला मंगळावरील नवीन `मॅजेन्टिक हील` नावाच्या भागात खोदकाम करण्यासाठी पाठवलंय. मंगळावरील पाणी हे जीवसृष्टीसाठी आवश्यक असं होतं. याआधीच मिळालेल्या आम्लीय पाण्याच्या पुराव्यापेक्षा हे पुरावे खूप जुने आहेत.
नासाचे संशोधक रे एर्विडसन यांच्या मते, हे ठिकाण पुर्वीच्या ठिकाणापेक्षा जास्त जुने आहे आणि मायक्रोबियल जीवनासाठी तिथं उत्तम परिस्थिती होती. यासंबंधीचा शोध निबंध `सायन्स जर्नल`मध्ये प्रकाशीत करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.