अमेरिकेत निष्पक्ष कारवाई होत नाही - स्नोडेन

आपल्यावर निष्पक्षपणे कारवाई होईल अशी शाश्वती नाही, त्यामुळे अमेरिकेत परतणार नाही. अमेरिका हेरगिरी करत असल्याचा खुलासा करणारा अमेरिकेचा एडवर्ड स्नोडेन असं म्हणतोय. एका ऑनलाईन चॅटमध्ये त्यानं असं मत व्यक्त केलय. वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते स्नोडेनन एका वेबसाइटवरही असं लिहलंय.

Updated: Jan 27, 2014, 02:51 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
आपल्यावर निष्पक्षपणे कारवाई होईल अशी शाश्वती नाही, त्यामुळे अमेरिकेत परतणार नाही. अमेरिका हेरगिरी करत असल्याचा खुलासा करणारा अमेरिकेचा एडवर्ड स्नोडेन असं म्हणतोय. एका ऑनलाईन चॅटमध्ये त्यानं असं मत व्यक्त केलय. वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते स्नोडेनन एका वेबसाइटवरही असं लिहलंय.
अमेरिकेत परतणं सरकार, जनता आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, पण अमेरिकेच्या व्हिसलब्लोअर कायद्यानुसार ते शक्य वाटत नाही. आपल्या घरीही जाता येणार नाही आणि न्यायालयासमोर म्हणणं मांडता येणार नाही. आपल्या देशात राष्ट्रीय सुरक्षा एन्जसीचा व्हिसलब्लोअर कायद्यात समावेश नाही, अशी स्नोडेनने खंत व्यक्त केली.
स्नोडेन सध्या रशियात शरणार्थी आहे. अमेरिकेची गुप्त कागदपत्रे जगासमोर मांडण्याचा आरोप स्नोडेनवर आहे. अवघ्या ३० वयाचा स्नोडेनने आपल्याच देशातील राष्ट्रीय सुरक्षा एन्जसीकडून होणाऱी हेरगिरी उघड केली होती. अमेरिकेकडून फोन टॅपिंग होत असल्याचे त्याच्यामुळे जगासमोर आले होते. तसेच हेरगिरी प्रकरणावर जगभरातील देशांनी अमेरिकेवर आपला रोष व्यक्त केला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.