‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

Updated: Sep 30, 2014, 10:09 AM IST
‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत! title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं. 

यानंतर परदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबामा आणि मोदी यांची भेट एका मैत्रिपूर्ण वातावरणात जाली. जवळपास ९० मिनिटं या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवला. यावेळी, दोन्ही नेत्यांनी आपला अनुभव एकमेकांशी शेअर केलाच आणि दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यावर एकमतही झालं.  

ओबामांच्या व्हाईट हाऊसला भेट... हा मोदींच्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. इथं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दरवाजावर येऊन मोदींचं स्वागत केलं. दोन्ही राष्ट्राध्यक्षांची ही पहिलीच भेट होती. 

ओबामा यांच्यासोबत डिनरसाठी उपराष्ट्रपती जोए बिडेन, परदेशमंत्र जॉन केरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुजैनराइस यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये पंतप्रधान मोदींसोबत परदेश मंत्री सुषमा स्वराज, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परदेश सचिव सुजाता सिंह आणि राजदूत एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते. 

बराक ओबामा यांनी पंतप्रधानांना दारावर जाऊन स्वागत केलं... ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्ट’ असं म्हणताना त्यांनी मोदींच्या स्वागतासाठी केलेली खास तयारीही दिसत होती. यावेळी, नरेंद्र मोदी यांनी ओबामा यांच्यासाठी आणलेली ‘भगवदगीता’ त्यांना भेट म्हणून दिली. तसंच मोदींनी, मार्टिन ल्युथर किंग यांची ऑडिओ रिकॉर्डिंग क्लिपही ओबामा यांना भेट म्हणून आणली होती.

पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या या पाच दिवसांच्या दौऱ्या दरम्यान त्यांचा नवरात्रीचा उपवासही सुरु आहे. त्यामुळे, ओबामांनी आयोजित केलेल्या या डिनरमध्ये त्यांनी केवळ लिंबू पाणी घेतलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.