मोदींचा गांधी परिवारला टोला, जावई बनविला १००० कोटीचा

 सिलीकॉन व्हॅलीमध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सॅप सेंटरमध्ये सुमारे १८५०० जणांसमोर करण्यात आलेल्या भाषणात त्यांनी आपल्या काही यशाबद्दल सांगितले. भ्रष्टाचारासंबंधी आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. 

Updated: Sep 28, 2015, 03:23 PM IST
मोदींचा गांधी परिवारला टोला, जावई बनविला १००० कोटीचा title=

सॅन होजे :  सिलीकॉन व्हॅलीमध्ये भारतीय समुदायासमोर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. सॅप सेंटरमध्ये सुमारे १८५०० जणांसमोर करण्यात आलेल्या भाषणात त्यांनी आपल्या काही यशाबद्दल सांगितले. भ्रष्टाचारासंबंधी आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. 

मोदींनी भारतीय राजकारणाबद्दल स्पष्टपणे काही बोलले नाही किंवा कोणाचे नावही घेतले नाही. पण त्यांचा स्पष्ट इशारा काँग्रेसकडे होता. त्यांनी इशाऱ्या इशाऱ्यात जावयाचा उल्लेख केला. 

आपल्या राजकारण्यांवर काही वेळाच आरोप लावण्यात येतात. याने ५० कोटी बनविले, त्याने १०० कोटी बनविले. मुलगी ५०० कोटीची आणि जावई १००० कोटीचा, चुलत भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतला, असा खास टोला लगावला. 

ते म्हणाले, मी आज तुमच्यामध्ये उपस्थित आहे, माझ्या कोणता आरोप आहे का, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की जगणार देशासाठी आणि मरणारही देशासाठी... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.