'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट

पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला. 

Updated: Aug 16, 2015, 11:25 PM IST
'यूएई'मध्ये मोदी-मोदीच्या घोषणा, पंतप्रधानांनी दिली शेख जायद मशीद भेट title=

अबूधाबी: पंतप्रधान मोदींनी यूएई मधील अबूधाबी इथं असलेल्या प्रसिद्ध शेख जायद मशीदला भेट दिली. यावेळी मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. यावेळी अनेक भारतीय नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रोटोकॉल तोडून मोदींनी नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक भारतीय मजुरांशीही संवाद साधला. 

पांढऱ्या रंगाची ही मशीद देशातील सर्वात सुंदर मशीद असल्याचं बोललं जातं. एकतेचं प्रतिक म्हणूनही या मशीदीकडे पाहिलं जातं. ही जगातील तिसरी सर्वात मोठी मशीद आहे. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पंतप्रधानांनी इथं सेल्फीही घेतली. यूएईच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना मशीदीबद्दल माहिती दिली. तसंच येणाऱ्यांच्या डायरीमध्ये शुभेच्छेचा संदेशही लिहिला. 

 

ही मशीद तीन हजार कामगारांनी बनवली असून ती संपूर्णपणे वातानुकुलीत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.