इस्लामाबाद: पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIचे माजी चीफ रिटार्यड जनरल हामिद गुलचं आज सकाळी निधन झालं. ६ ऑगस्टला त्यांच्या नावानं असलेल्या ट्विटर अकाउंटवरून दिल्ली-मुंबईला हिरोशिमा-नागासाकी बनविण्याची धमकी दिली गेली होती. गुलला मुरेच्या कंबाइंड मिलिट्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हामिद गुलने दिली होती धमकी?
हामिद गुल यांच्या नावानं करण्यात आलेल्या ट्विटनंतर वाद सुरू झाला होता. ते अकाऊंट त्यांचं होतं की बनावट होतं, याबद्दल अजून कळलं नाहीय. गुल नेहमी भारतावर पाकिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये दखल देत असल्याचा आरोप लावत होते. एका रिपोर्टनुसार गुल यांनी १७ एप्रिलला दिलेल्या इंटरव्हूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारत अजीत डोबाल यांच्यावर पाकिस्तानला धमकावण्याचा आरोप लावला होता.
१९६५च्या युद्धात होते टँक कमांडर
गुल ७९ वर्षांचे होते. १९५४मध्ये ते पाकिस्तानी सैन्यात भर्ती झाले होते. १९६५च्या युद्धात गुल टँक कमांडर होते. जनरल गुल १९८७ पासून १९८९ पर्यंत ISIचे प्रमुख होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.