नवी दिल्ली/मियामी: अमेरिकेच्या मियामीमध्ये झालेल्या मिस युनिवर्स २०१४ स्पर्धेत मिस कोलंबियानं मिस युनिवर्सचा खिताब जिंकला. कोलंबियाची सुंदरी पॉलिना वेगानं रविवारी रात्री मिस युनिवर्स २०१४चा मुकुट जिंकला. तर मिस युएसएस या स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली. याशिवाय मिस युक्रेन सेंकड रनर अप आणि मिस नेदरलँड थर्ड रनर अप होती.
मिस युनिवर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी नोयोनिता लोध पहिल्या १० सौंदर्यवतींमध्ये जागा मिळविण्यात अपयशी ठरली. बंगळुरूत राहणारी २१ वर्षीय नोयोनिता ८८ देशांमधील या स्पर्धेत पहिल्या १५मध्ये जागा बनवली होती. मात्र रविवारी रात्री ती स्पर्धेतून बाहेर पडली.
मिस युनिवर्स २०१३ व्हेनेझुएलाची गेब्रिएला इस्लरनं नव्या मिस युनिवर्सला मुकुट घातला. भारतीय सुंदरी लारा दत्तानं २००० साली मिस युनिवर्सचा खिताब जिंकला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.