नवी दिल्ली: आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.
मॉली पेरिनचा जन्म २७ एप्रिलला झाला. २७व्या आठवड्यातच तिचा जन्म झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं ती placental disorder नं पीडित आहे. डॉक्टरांनी दु:खी आई-वडील स्टेफनी आणि जेम्सला पहिलेच सांगितलं की, मुलगी तीन आठवड्यांपेक्षा जास्त जगू शकणार नाही.
सौजन्य- डेलीमेल
मात्र मॉलीच्या जबरदस्त इच्छाशक्तीनं डॉक्टरांना चुकीचं सिद्ध केलं. तीन आठवड्यांनंतर ती आई-वडीलांच्या कुशीत होती आणि आज ती १७ आठवड्यांची झालीय. पूर्व यॉर्कशायरमध्ये राहणारं हे कुटुंब आता आपल्या मुलीला घरी नेण्याची तयारी करतंय.
डेली मेलमध्ये आलेल्या बातमीनुसार जेम्सचं म्हणणं आहे की, त्याला आणि त्याच्या पत्नीला आतापर्यंत विश्वास बसत नाहीय, की ते आता आपल्या मुलीला घरी नेणार आहेत. placental disorder मुळे गर्भाशयात मॉलीचा विकास खूप कमी होत होता. २७ एप्रिलला स्टेफनीचं सी-सेक्शन करून मॉलीचा जन्म झाला. त्यानंतर स्टेफनीही दोन आठवडे हॉस्पिटलमध्ये होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.