मेकअप काढल्यावर पत्नी समोर आली तर बसला धक्का

 हे सर्वच जाणतात की महिला मेकअपमध्ये वेगळ्या आणि मेकअप काढल्यावर वेगळ्या दिसतात. एका लग्नानंतर वधुला मेकअप उतरविल्यानंतर वराने पाहिल्यावर धक्का बसला. झालेल्या धोख्याबद्दल त्याने कोर्टात पत्नी विरोधात केस दाखल केली. 

Updated: Aug 6, 2015, 09:22 PM IST
मेकअप काढल्यावर पत्नी समोर आली तर बसला धक्का title=

नवी दिल्ली :  हे सर्वच जाणतात की महिला मेकअपमध्ये वेगळ्या आणि मेकअप काढल्यावर वेगळ्या दिसतात. एका लग्नानंतर वधुला मेकअप उतरविल्यानंतर वराने पाहिल्यावर धक्का बसला. झालेल्या धोख्याबद्दल त्याने कोर्टात पत्नी विरोधात केस दाखल केली. 

मेकअप केल्यावर तरूणी वेगळ्या दिसतात हे सत्य या नवरोबाला माहित नसेल असे या घटनेवरून दिसत आहे. त्यामुळे त्याने पहिल्या आपल्या पत्नीला बिना मेकअप पाहिल्यावर त्या धक्का बसला. त्याला विश्वास बसत नव्हता, आपले ज्या मुलीशी लग्न झाले, ती हीच आहे. 

अल्जेरियात लग्नानंतर सकाळी उठल्यावर या व्यक्तीच्या समोर त्याची पत्नी उभी होती. तिचा चेहरा पाहिल्यावर तिला विश्वास बसत नव्हता. या तरूणीला पाहिल्यावर त्याला वाटले की घरात कोणी चोर घुसली आहे. पण त्या तरुणीने त्याला सांगितले, की मी तुझी पत्नी आहे. पण आपली फसवणूक झाली म्हणून त्याने केस दाखल केली. 

या व्यक्तीने महिलेविरूद्ध २० हजार डॉलरचा दावा दाखल केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.