अमेरिकेत सापडला २०० वर्षांचा दुर्मिळ मासा

अमेरिकेतील सिएटल येथील हौशी मच्छीमाराने एक अद्भूत मासा पकडला असून तो सुमारे २०० वर्षांपूर्वीचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 4, 2013, 06:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सित्का (अमेरिका)
अमेरिकेतील सिएटल येथील हौशी मच्छीमाराने एक अद्भूत मासा पकडला असून तो सुमारे २०० वर्षांपूर्वीचा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
४१ इंच लांब असलेला हा दुर्मिळ मासा अलास्कातील सित्का येथे ९०० फूट खोल पाण्यात सापडला. त्याचे वजन ३९.०८ पौंड आहे. हा नारंगी रंगाचा मासा रॉक फिश या प्रजातीचा असून याला शॉर्ट्रेकर असे म्हणतात, तो साधारण २०० वर्षांचा असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
शॉर्ट्रेकर हा रॉकफिश सर्वात जास्त जगणाऱ्या माश्यांपैकी एक आहे. त्याचे साधारण वयोमान १२० वर्षे आहे. हा मासा अलास्का किनारपट्टी, रशिया, उत्तर कॅलिफोर्निया येथे ९९० फूट ते १६५० फूट खोल पाण्यात सापडतो.
या माशाला तळावर आणल्यावर तो मरण पावला. तो खोल पाण्यातच जीवंत राहतो. सध्या या माशाचे काही सॅम्पल अलास्का मत्स्य खात्याकडे पाठवले आहे. यावरूनच त्याचे खरे वय समजणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.