ओस्लो, नॉर्वे: मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले.
११ लाख डॉलर्सचा अत्यंत मानाचा पुरस्कार स्वीकारताना, जगातल्या प्रत्येक मुलाचा शिक्षणावर, आरोग्यावर, चांगल्या आयुष्यावर अधिकार असल्याचं सत्यार्थी म्हणाले.
जगामध्ये करूणेचा अभाव असून करूणा असलेल्या प्रत्येकानं एकत्र येऊन जगामधला अंध:कार दूर करायला हवा असं आग्रही प्रतिपादन स्तयार्थी यांनी केलं. जगामध्ये लष्करावर होणाऱ्या खर्चापैकी एक आठवड्याचा खर्च लहान मुलांवर खर्च केला तर बालकामागाराचा प्रश्न लगेच सुटेल, असं सांगताना सत्यार्थी यांनी जगभरातल्या गरीब आणि अत्याचारांना बळी पडणाऱ्या मुलांच्या ह्रदयद्रावक स्थितीचं वर्णन केलं आणि प्रत्येकानं आपल्यामध्ये दडलेल्या मुलाला स्मरून या मुलांचं दु:ख हलकं करायला हवं असं आवाहन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.