पेशावरचा दहशतवाद्यांचा हल्ला भ्याड आणि निंदनीय - मलाला

नोबेल शांति पुरस्कार विजेता पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला यूसुफजई हिनं पेशावरमधल्या हल्ल्याची निंदा केलीय. 

Updated: Dec 17, 2014, 09:32 AM IST

लंडन : नोबेल शांति पुरस्कार विजेता पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ती मलाला यूसुफजई हिनं पेशावरमधल्या हल्ल्याची निंदा केलीय. 

आपल्यासोबतच करोडो लोक तालिबाननं मुलांवर केलेल्या हल्ल्यामुळे शोकाकूळ आहेत. पाकिस्तानच्या सैनिकी शाळेवरच्या या हल्ला धक्कादायक आणि संतापजनक असल्याचंही तिनं म्हटलंय. 

मी या क्रूर आणि भ्याड हल्ल्याची निंदा करत आहे, असं मलालानं म्हटलंय. तालिबानच्या दहशतवाद्यांनी यापूर्वी मलाला यूसुफजई हिलाही आपला निशाणा बनवलंय. परंतु, या हल्ल्यात ती थोडक्यात बचावली होती.

पेशावरच्या वरसाक रोडस्थित आर्मी पब्लिक स्कूलमध्ये हत्यारांसहीत आणि दारुगोळ्यासहीत दाखल झालेल्या आत्मघाती हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानं १३२ चिमुरड्यांसहीत १४१ बळी घेतलेत. हल्ला करणारे दहशतवादी अरबी भाषेत बोलत होते. स्वत:ला बॉम्बनं उडवण्यापूर्वी त्यांनी आर्मी शाळेत अंदाधुंद गोळीबार केला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.