'फ्री'मध्ये जगाची सैर, पाहा काय आहे ऑफर

तुम्हाला जगाची सैर करायची आहे आणि खिशात तेवढे पैसेही नाही तरी तुम्ही फ्रीमध्ये जगाची सैर करण्यासाठी हा प्रयत्न करु शकता. विमान यात्रा, हॉटेलमध्ये राहणं, जेवन आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत.

Updated: May 5, 2016, 09:28 AM IST
'फ्री'मध्ये जगाची सैर, पाहा काय आहे ऑफर title=

मुंबई : तुम्हाला जगाची सैर करायची आहे आणि खिशात तेवढे पैसेही नाही तरी तुम्ही फ्रीमध्ये जगाची सैर करण्यासाठी हा प्रयत्न करु शकता. विमान यात्रा, हॉटेलमध्ये राहणं, जेवन आणि इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहेत.

वाव एअर नावाच्या या एअरलाईन्स कंपनींने उन्हाळ्याच्या दिवसात ४ अशा लोकांचा शोध घेत आहेत ज्यांना फ्रीमध्ये चार देश फिरण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त स्नॅपचॅट करावं लागणार आहे.

कशी असेल ट्रिप

आइसलँडच्या या एअरलाईन्सने निवडलेल्या 'स्नॅप ट्रॅवलर्स'ला २८ ठिकाणांपैकी ४ ठिकाणी पाठवणार आहे. यामध्ये बार्सिलोना, कोपेनहेगन, वारसा, सेंट फ्रांसिस्को याचा ठिकाणांचा समावेश आहे. जून ते ऑगस्ट दरम्यान या फ्री टूर दिली जाणार आहे.

ट्रिप ३ ते ८ दिवसांची असेल. यामध्ये तुम्हाला कमीतकमी २ स्नॅपचॅट करावे लागणार आहेत. याबाबतचे नियम WOW AIR च्या वेबसाईटवर तुम्ही वाचू शकता.

काय आहेत अटी

इच्छुकाचं वय १८ वर्षापेक्षा अधिक असावं आणि तो पूर्णपणे आरोग्याच्या बाबतीत फीट असावा. तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे.

यासाठी तुम्हाला एक स्नॅपचॅट स्टोरी बनवून त्यांच्या वेबसाईटवर पाठवायची आहे.

तुम्हाला तुमचा इमेल, ट्विटर, इंस्टाग्राम आणि ट्विटरची माहिती द्यायची आहे.

WOW AIR विजेत्यांची घोषणा सोशल मीडिया अकाउंटवर १७ मे रोजी करणार आहे.