मंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...

वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे. 

Updated: Feb 9, 2016, 01:46 PM IST
मंगळावरही माकडांचा संचार असल्याचा दावा...  title=
सौजन्य - एक्सप्रेस न्यूज, यु. के.

वॉशिंग्टन : 'यूएफओ सायटिंग डेली' या नियतकालीकाचे संपादक असणाऱ्या स्कॉट वेरिंग यांच्या माहितीनुसार, अमेरिकेला 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या 'क्युरिओसिटी' यानाच्या माध्यमातून काहीतरी ठोस माहिती मिळाली आहे. पण, अमेरिका मात्र हे सत्य जागापासून लपवत आहे.

स्कॉट वेरिंग त्यांचा बराच वेळ नासा आणि इतर अंतराळ संस्थांनी जाहीर केलेल्या अंतराळातील छायाचित्रांचे निरीक्षण करण्यात घालवतात. आता गेले काही महिने ते अंतराळात विविध ठिकाणी जीव आहेत किंवा मृत जीवांचे अवशेष आहेत, असा दावा करणारे काही फोटोज रिलीज करण्यासाठी देत आहेत. अंतराळातील काही ग्रहांवर इमारतसदृश्यं साचे, कलाकुसरीच्या काही गोष्टी आढळल्याचे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय.  

आता त्यांनी केलेल्या एका नव्या दाव्यानुसार, मंगळ ग्रहावर माकड किंवा वानरासारखा काहीतरी जीव आढळल्याचा त्यांचा दावा आहे. एका लहानशा टेकडीच्या बाजूला हे माकड बसून काहीतरी करत आहे, असं स्पष्ट दिसत असल्याचा त्यांचा दावा आहे. यापूर्वीही मंगळवार खेकडे, ससा यांसारखे जीव सापडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.