हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

Updated: Sep 23, 2015, 09:43 PM IST
हाफिज सईद, दाऊद इब्राहीमसह मोस्ट वॉन्टेडची यादी भारत देणार अमेरिकेला title=

न्यू यॉर्क :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी देणार आहे. यात २६/११ हल्ल्याशी संबंधीत दहशतवाद्यांची यादी आहे. 

लष्करचा म्होरक्या हाफिज सईद, जकीउर रहमान लखवी, दाऊद इब्राहिम, टाइगर मेमनसह अनेक मोठ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारत नव्याने पुढाकार घेणार आहे. ही यादी दिल्यावर भारत त्यांना पकडण्यासाठी अमेरिकेशी करार करणार असल्याचे समोर येत आहे. 

या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एफबीआयची मदत घेतली जाणार आहे. 

यादीतील दहशतवाद्यांची नावे पुढील प्रमाणे 

हाफिज सईद, जकी उर रहमान लखवी, दाऊद इब्राहिम, युसूफ मुजामिल (जम्मू-कश्मीरात दहशतवादी कारवाऱ्यामध्ये सामील), राशि‍द अब्दुल्लाह उर्फ रहमान (कराचीत दहशतवादी हल्ला केला.), सज्जाद मीर (26/11 हल्लात सामील), मेजर इकबाल (पाकिस्तान इंटेलिजेंस माजी अधिकारी, 26/11चा गुन्हेगार यावेळी पाकिस्तानात आहे.  राशीद अब्‍दुल्‍ला उर्फ रेहान, मेजर सैयद मोहम्मद अब्दुर रहमान हाशमी (पूर्व आयएसआय अधि‍कारी), मेजर समीर अली, आमिर रजा खान, रि‍याज भटकल (भारतात अनेक दहशतवादी हल्ले करण्यात हात. , टाइगर मेमन, अनीस इब्राहिम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.