नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार दिली जाणारी धमकी आणि दर्पोक्तीच्या पार्श्वभूमीवर आता भारतानही याला जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.
पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी पाकिस्तानला सतेतोड प्रत्यूत्तर दिलंय. 'जम्मू-काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे, यावर आता कोणताही संशय नाही. याच्याशीच निगडीत जर काही मुद्दा असेल तर तो हा की 'पाकव्याप्त काश्मीर'ला (पीओके) आता भारतात कोणत्या पद्धतीनं सामील करत येईल. आता आम्ही पीओकेबद्दल विचार करत आहोत. भारत आता पाकिस्तानला चांगल्या पद्धतीनं प्रत्यूत्तर देणार आहे. त्यांनी शेजारी देशाला आठवण करून दिलीय की गेल्या 67 वर्षांपासून त्यांनी या भागावर अवैध कब्जा करून ठेवलाय' असं सिंह यांनी म्हटलंय.
व्हिडिओ : पाक नागरिक मोदींवर टीका करायला गेला, आणि...
पाकिस्तान आर्मी चीफ राहिल शरीफ यांच्या भडकावू भाषणानंतर जितेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलंय. काश्मीर हा पाकिस्तानचा अपूर्ण राहिलेला अजेंडा आहे, असं रावळपिंडीत 1965 च्या युद्धाच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राहिल शरीफ यांनी वक्तव्य केलं होतं.
अधिक वाचा - मोदी सरकारचा करिष्मा, पाक व्याप्त काश्मिरला भारतात येण्याची इच्छा
'भारतानं कोणतंही दुस्साहस करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ, मग ती परंपरागत लढाई असेल किंवा गैर परंपरागत... आम्ही प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहोत' अशी दर्पोक्ती शरीफ यांनी यावेळी झाडली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.