टोकियो : जपान पुढील पाच वर्षात भारतीय रेल्वेमध्ये आता १४० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्यात देशभरातील ४०० रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
रेल्वेकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकानुसार रेल्वे स्टेशन विकास योजनेत उद्योगांच्या संधीच्या अध्ययनासाठी जपानचे एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. या योजनेत ४०० रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
रेल्वे क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर गेलेले रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो एबे, उप पंतप्रधान आणि अर्थमंत्री तारो असो यांच्याशी भेट घेतली.
१४० अब्ज डॉलरच्या या गुंतवणूकीत जपान रेल्वे आणि काही जपानी कंपन्यांचा समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.