Watch : गल्फ देशात सोन्याचं मशीद बांधायला पैसे आहेत पण नाही शरणार्थींसाठी

Updated: Sep 11, 2015, 03:13 PM IST

 

 

when god is sleep share this video as many times till he's wake

tsunami of refugees entering europe

Posted by Sammy Montaj on Monday, September 7, 2015

 

दुबई :  गल्फमधील सहा देशांकडे अमाफ पैसा आहे, ते त्यांची शानोशौकत सोन्याचं मशीद, मोठमोठ्याला इमारती आणि इतर गोष्टी तयार करण्यात खर्च करतात. पण शेजारी देश असलेल्या सिरियात युद्ध सुरू असताना त्या देशातील शरणार्थींसाठी मात्र त्यांच्याकडे पैसा नसल्याचे दिसून येत आहे. 

अधिक वाचा : आयलानची बॉडी उचलणाऱ्या पोलिसाला जबर धक्का

सिरीयातील बहुताशी शरणार्थी जर्मनी, कॅनडा, नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियात आसरा घेत आहेत. इस्लामिक स्टेटच्या भीतीने सिरीयातील लोक भयभीत झाले आहेत. पण सहा गल्फ देश असलेल्या पैकी बहारीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, आणि यूएई यांना त्यांचा पाझर फुटत नाही आहे. 

आयलीनमुळे सत्य आले जगासमोर
तुर्कीतील प्रसिद्ध अंकारा बीचवर एक आपलं काळीज पिळवटून टाकणारं दृश्य दिसलं. सध्या सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा झाली. जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. हा मुलगा कोण याची चर्चा होती. मात्र, त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनंतर जगालाच हादरा बसला. तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर तीन वर्षांचा मुलगा आयलान याचा बुडून मृत्यू झाला होता. या निरागस चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूनं अख्खं जग हळहळलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.