कराची : जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि भारतातल्या अनेक अतिरेकी कारवायांचा मास्टरमाईंड असलेल्या मसूद अझरला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानातल्या पंजाब राज्याचे कायदामंत्री राणा सनाउल्ला यांनीच हे जाहीर केले आहे. मसूदच्या अटकेवरून काल भारत आणि पाकिस्तानात असलेला संभ्रम यामुळे दूर झाला आहे.
अधिक वाचा : पठाणकोट ह्ल्ल्याचा मास्टर माईँड मसूद अजहरला अटक
अझरला अटक करण्यात आलेली नाही, तर त्याला त्याच्या साथीदारांसह केवळ नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं राणा यांनी म्हटलंय. पठाणकोट हल्ल्यात अझरचा हात असल्याचं स्पष्ट झालं, तर त्याला अटक केली जाईल, असंही ते म्हणालेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जैश ए मोहम्मदच्या ३१ हस्तकांना पाकिस्तानच्या विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानात दहशतवाद्यांना खतपाणी मिळत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.